Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्लॉप 'डेटिंग' साईट ते १८ लाख कोटींचे साम्राज्य! यूट्यूबच्या जन्माची गोष्ट; ३ मित्रांनी बदलला जगाचा इतिहास

फ्लॉप 'डेटिंग' साईट ते १८ लाख कोटींचे साम्राज्य! यूट्यूबच्या जन्माची गोष्ट; ३ मित्रांनी बदलला जगाचा इतिहास

Story of YouTube : YouTube च्या स्थापनेपासून ते जगातील सर्वात मोठे व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनण्यापर्यंतच्या उदयाची कहाणी आकर्षक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:27 IST2026-02-16T13:21:52+5:302026-02-16T13:27:42+5:30

Story of YouTube : YouTube च्या स्थापनेपासून ते जगातील सर्वात मोठे व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनण्यापर्यंतच्या उदयाची कहाणी आकर्षक आहे.

The Story of YouTube From a Failed Dating Site to a Billion-Dollar Empire | फ्लॉप 'डेटिंग' साईट ते १८ लाख कोटींचे साम्राज्य! यूट्यूबच्या जन्माची गोष्ट; ३ मित्रांनी बदलला जगाचा इतिहास

फ्लॉप 'डेटिंग' साईट ते १८ लाख कोटींचे साम्राज्य! यूट्यूबच्या जन्माची गोष्ट; ३ मित्रांनी बदलला जगाचा इतिहास

Story of YouTube : आज युट्यूब हे जगात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पण, याची सुरुवात एका फ्लॉप आयडियातून झाली असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. युट्यूब क्रांतीची सुरुवात एका अपयशातून झाली होती, हे फार कमी लोकांना माहीत आहे. सिलिकॉन व्हॅलीतील एका छोट्याशा ऑफिसमध्ये चाड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या तीन मित्रांनी एक 'व्हिडिओ डेटिंग' वेबसाईट बनवली होती, जी पूर्णपणे फ्लॉप ठरली. पण याच अपयशाच्या राखेतून जगातील सर्वात मोठा व्हिडिओ प्लॅटफॉर्म 'यूट्यूब' जन्माला आला.

पेपॅलमधील मैत्री आणि एक धाडसी स्वप्न
चाड, स्टीव्ह आणि जावेद यांची पहिली भेट 'पेपॅल'मध्ये काम करताना झाली होती. जेव्हा ईबेने पेपॅल खरेदी केले, तेव्हा या तिघांच्या हाती काही पैसे आले. त्याकाळी इंटरनेटवर फोटो शेअर करणे सोपे होते, पण व्हिडिओ शेअर करणे कठीण होते. ईमेलला फाईल साईजची मर्यादा होती. हीच अडचण दूर करण्यासाठी त्यांनी १४ फेब्रुवारी २००५ रोजी 'यूट्यूब'चा डोमेन रजिस्टर केला. सुरुवातीला ही एक डेटिंग साईट होती, पण तिथे कोणीही व्हिडिओ अपलोड केला नाही.

दोन घटनांनी बदलला विचार
जावेद करीम यांना २००४ ची सुनामी आणि जॅनेट जॅक्सनचा एक गाजलेला व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर शोधूनही सापडत नव्हती. सगळीकडे फक्त लेख होते, व्हिडिओ नाही. यातूनच त्यांना कल्पना सुचली की, अशी एक जागा असावी जिथे जगातील कोणताही माणूस सहज व्हिडिओ टाकू शकेल आणि पाहू शकेल. त्यांनी डेटिंगचा नाद सोडला आणि यूट्यूब सर्वांसाठी खुले केले.

१९ सेकंदांचा तो पहिला व्हिडिओ...
२३ एप्रिल २००५ रोजी जावेद करीम यांनी यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड केला. 'Me at the zoo' असे शीर्षक असलेल्या केवळ १९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये जावेद हत्तींसमोर उभे होते. हा व्हिडिओ आज साधा वाटत असला, तरी त्याने एका महाकाय क्रांतीची पायाभरणी केली होती. डिसेंबर २००५ पर्यंत यूट्यूबवर दररोज २० लाख लोक येऊ लागले आणि हा प्लॅटफॉर्म एक सवय बनला.

जेव्हा गुगलने लावला १.६५ अब्ज डॉलर्सचा डाव
यूट्यूबची वाढ इतकी वेगवान होती की, या तिघांना सर्व्हरचा खर्च पेलवेनासा झाला. दरम्यान, स्वतःचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म चालवण्यात अपयशी ठरलेल्या गुगलने यूट्यूबची ताकद ओळखली. दीड वर्ष जुन्या या कंपनीला गुगलने १.६५ अब्ज डॉलर्सना (आजच्या हिशोबात सुमारे १३,६०० कोटी रुपये) खरेदी केले. अनेकांनी तेव्हा गुगलला वेडे ठरवले होते, पण आज यूट्यूबची किंमत लाखो कोटींच्या घरात आहे.

वाचा - वजन घटवणाऱ्या औषधाच्या मंजुरीमुळे गुंतवणूकदार मालामाल; कंपनीचा शेअर एका दिवसात १२% वधारला

आज हे तीन मित्र काय करतात?

  • चाड हर्ले : २०१० पर्यंत यूट्यूबचे सीईओ होते. आज ते बास्केटबॉल आणि फुटबॉल टीम्सचे मालक असून मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
  • स्टीव्ह चेन : ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारावर मात करून ते पुन्हा स्टार्टअपच्या दुनियेत परतले. सध्या ते ताइवानमध्ये एआय आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहेत.
  • जावेद करीम : यांनी आपली इन्व्हेस्टमेंट फर्म सुरू केली. त्यांनी सुरुवातीच्या काळात 'एअरबीएनबी' आणि 'रेडिट'सारख्या दिग्गज कंपन्यांत गुंतवणूक केली. ते प्रसिद्धीपासून दूर राहतात, पण यूट्यूबच्या पॉलिसीवर आजही आपल्या पहिल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून टीका करतात.

Web Title : फ्लॉप डेटिंग साइट से यूट्यूब: नवाचार का इतिहास

Web Summary : यूट्यूब, जो अब एक वैश्विक मंच है, की शुरुआत एक असफल डेटिंग साइट के रूप में हुई। तीन दोस्तों, चाड हर्ले, स्टीव चेन और जावेद करीम ने अपनी विफलता को आज के वीडियो विशाल में बदल दिया। उनकी नवीन भावना ने शुरुआती असफलताओं के बाद ऑनलाइन वीडियो साझाकरण में क्रांति ला दी।

Web Title : From Flop Dating Site to YouTube: A History of Innovation

Web Summary : YouTube, now a global platform, began as a failed dating site. Three friends, Chad Hurley, Steve Chen, and Jawed Karim, transformed their flop into the video giant we know today. Their innovative spirit revolutionized online video sharing after facing initial setbacks.